माझा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला तर…’: रशियन स्पेस एजन्सीचे वक्तव्य शेअर करून एलन मस्क यांनी असे का म्हटले


जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क हे अनेकदा चर्चेत असतात. ते दररोज असे ट्विट करतात, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडत असते. यावेळीही मस्क यांनी असेच काहीसे केले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, माझा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला तर…’ त्यांनी स्पष्टपणे काहीही लिहिले नसले, तरी या ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

या ट्विटनंतर एलन मस्क यांचे चाहतेही अनेक प्रकारचे ट्विट करत आहेत. अनेक लोक मस्क यांना असा विचार करू नका असा सल्ला देत आहेत, तर काही जण त्यांना ट्रोलही करत आहेत. पण, त्यांचे ट्विट बरेच काही दर्शवत आहे. खरे तर, मस्क यांनी या ट्विटपूर्वी रशियन स्पेस एजन्सी Roscosmos चे प्रमुख दिमित्री ओलेगोविच रोगोझिन यांच्याबद्दलही ट्विट केले होते.

युक्रेन युद्धाशी संबंधित आहे का मस्कचे ट्विट ?
एलन मस्क यांनी स्पष्ट शब्दात काहीही लिहिले नसले, तरी त्यांच्या ट्विटची मालिका पाहिली तर अनेक लिंक जोडल्या जात आहेत. वास्तविक या ट्विटपूर्वी मस्क यांनी आणखी एक ट्विट शेअर केले होते. त्यात असे म्हटले आहे की रशियन स्पेस एजन्सीचे प्रमुख रोसकोसमॉस यांनी मीडियाला सांगितले की, 36 व्या युक्रेनियन मरीन ब्रिगेडचे पकडलेले कर्नल दिमित्री कोर्मयान्कोव्ह यांच्या साक्षीवरून असे आढळून आले आहे की मस्क यांचा उपग्रह मारियुपोलमधील युक्रेनियन सैन्याला इंटरनेटचा वापर करु देत होते. या निवेदनात युक्रेनच्या सैन्याला दळणवळणाच्या सुविधा पुरवल्याबद्दल मस्क यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

काय आहे रोगोझिनचे संपूर्ण वक्तव्य ?
वृत्तानुसार, रशियन स्पेस एजन्सीचे प्रमुख रागोझिन यांनी रशियन मीडियाला सांगितले आहे की एलन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचे इंटरनेट टर्मिनल नाझी अझोव्ह बटालियन आणि मारियुपोलमधील युक्रेनियन मरीनच्या दहशतवाद्यांना हेलिकॉप्टरद्वारे देण्यात आले होते. दरम्यान स्टारलिंक उपकरणांची डिलिव्हरी पेंटागॉन (यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सचे मुख्यालय) च्या मदतीने करण्यात आली. हे वक्तव्य ट्विटरवर शेअर करत मस्क यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावरही हल्लाबोल केला. पुतीन यांचे नाव न घेता म्हटले – नाझींची जी व्याख्या त्यांना माहीत आहे, पण ती तशी नाही.