ठाण्यात नाचवल्या नंग्या तलवारी, लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या महिलेसह पाच जणांना अटक


ठाणे – मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी रात्री सार्वजनिकपणे तलवारी, चाकू, कुऱ्हाडी घेऊन काही जणांनी दहशत माजवली. याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील दहिसर मोरी आणि ठाकूरपाडा गावात ही घटना घडल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. शस्त्रे उगारणाऱ्यांपैकी काहीजण पकडले गेले आहेत. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पाच जणांना अटक करण्यात आली. शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी रात्री 12.15 ते 3.45 च्या दरम्यान, आरोपी हातात तलवारी, कुऱ्हाडी आणि चाकू घेऊन या भागात फिरले आणि स्थानिक रहिवाशांना घाबरवले. त्यांनी अनेक घरांचे दरवाजे उचकटून रहिवाशांना विनाकारण धमकावले. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.

अखेर काही गावकऱ्यांनी धाडस दाखवत आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, त्यांना नंतर अटक करण्यात आली. जावेद सलीम शेख, दिलवर फरीद शेख, शाहिद नसीर शेख, साद अहमद आणि मारिया जावेद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्व आयपीसी कलम 143 (बेकायदेशीर सभा), 147 (दंगल), 148 (प्राणघातक शस्त्रे बाळगणे), 323 (जाणूनबुजून दुखापत करणे), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने जाणूनबुजून चिथावणी देणे), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांच्या टोळीत आणखी काही जणांचा समावेश असून, त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. शस्त्र उगारण्यामागे त्याचा हेतू काय होता, याचाही शोध घेतला जात आहे.