नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा महागाईने जनता होरपळणार आहे. घरगुती एलपीजी (14.2 किलो) सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाल्यामुळे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तेल कंपन्यांनी 50 रुपयांनी शनिवारी एलपीजी गॅस सिलेंडर महाग केला आहे. यासह, आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 999.50 रुपयांवर गेली आहे. मार्च 2022 मध्येही सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याच वेळी, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत गेल्या आठवड्यात 102 रुपयांनी वाढ करण्यात आली होती, त्यानंतर त्याची किंमत 2253 रुपये करण्यात झाली होती.
महागाईचा पुन्हा सर्वसामान्यांना फटका, घरगुती गॅस सिलेंडर झाला महाग, जाणून घ्या काय आहेत नवे दर
सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत असताना एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. आता एलपीजीच्या वाढलेल्या किमतीही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. 1 मे रोजी 19 किलोच्या व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरची किंमत 102.50 रुपयांनी वाढवण्यात आली होती. त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 2355.50 रुपयांवर पोहोचली. त्याचबरोबर 5 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमतही 655 रुपयांवर पोहोचली आहे.
याआधी कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 2,253 रुपये करण्यात आल्या. त्याच वेळी, 1 मार्च रोजी, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा 105 रुपयांनी वाढ करण्यात आली. देशातील सर्वसामान्य जनता सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे हैराण झालेली असतानाच एलपीजी गॅस सिलेंडरचे वाढलेले दर त्यांना आणखी रडवणार आहे.