मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कालच व्हॉट्सअॅप इमोजी रिअॅक्शन जाहीर केल्या आणि आता आणखी एक मोठे वैशिष्ट्य व्हॉट्सअॅपवर येत आहे. व्हॉट्सअॅपमध्ये, तुम्हाला खूप लोक जोडण्यासाठी दोन ग्रुप तयार करण्याची आवश्यकता नाही, कारण लवकरच तुम्ही एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 512 लोकांना जोडू शकणार आहोत. सध्या, व्हॉट्सअॅपच्या या नवीन वैशिष्ट्याची बीटा आवृत्तीवर चाचणी केली जात आहे आणि त्याचे अपडेट सर्वांसाठी केव्हा जारी केले जाईल याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटमुळे एकाच ग्रुपमध्ये करता येणार 512 लोकांना अॅड
व्हॉट्सअॅपच्या फीचर्सची माहिती देणाऱ्या WABetainfo ने 512 लोकांच्या ग्रुपमध्ये अॅड केल्या जाणाऱ्या फीचरची माहिती दिली आहे. नवीन फीचरचा स्क्रीनशॉट देखील समोर आला आहे, ज्यामध्ये 512 लोकांना ग्रुपमध्ये अॅड करण्याचा पर्याय मिळत असल्याचे दिसून येते. नवीन फीचरची चाचणी iOS च्या बीटा आवृत्तीवर केली जात आहे. नवीन फीचर शाळा, महाविद्यालये, कोणतीही संस्था आणि लहान व्यवसायांसाठी खूप उपयुक्त ठरेल. सध्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये केवळ 256 लोकांनाच अॅड करता येते.
2 GB पर्यंत पाठवू शकतात फाइल्स
इमोजी रिअॅक्शन आणि ग्रुपमध्ये 512 लोकांना अॅड करण्याव्यतिरिक्त आणखी एक नवीन फीचर व्हॉट्सअॅपमध्ये येत आहे. नवीन अपडेटनंतर तुम्ही व्हॉट्सअॅपवरच २ जीबीपर्यंतच्या फाइल्स पाठवू शकाल. फाईल पाठवताना, ती फाईल पाठवायला किती वेळ लागेल हे देखील तुम्हाला पूर्वावलोकनात दिसेल. 2 GB फायल असलेले वैशिष्ट्य सध्या बीटा चाचणीत आहे. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की 2GB पर्यंतच्या फाइल्स पाठवण्यावरही एंड-टू-एंड पूर्णपणे एन्क्रिप्टेड असेल.