रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी महाराष्ट्राला दिला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री


पुणे : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी पुण्यातील हडपसर परिसरात आयोजित जाहीर सभेत ही माहिती दिली. शिवसेना नेते राऊत यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना हे सांगितले आहे, ज्यात दानवे म्हणाले होते की, त्यांना ब्राह्मण व्यक्तीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहायचा आहे. संजय राऊत म्हणाले की, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला.

ते म्हणाले, रावसाहेब दानवे यांचे ते वक्तव्य मी पाहिले, ज्यात ते महाराष्ट्रासाठी ब्राह्मण मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातील जनता ही बहुजन समाजाची आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करत सर्व मराठी भाषिकांना एकत्र आणण्याचे काम केले. पण मला एक समजत नाही, यांना राज्याला जाती-वर्गात का विभागायचे आहे.मुख्यमंत्रिपदासाठी ब्राह्मण पाहायचे आहे की नाही हे राज्यातील जनतेला ठरवू द्या आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय शिवसेना घेईल, असे राऊत म्हणाले.

‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या न्यूज वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यसभा खासदार संजय राईत यांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांची खिल्ली उडवली आणि म्हणाले, ब्राह्मण मुख्यमंत्र्याबद्दल तुम्ही कोणाला सांगत आहात. ते बाळासाहेब होते, ज्यांनी 1995 मध्ये मनोहर जोशींच्या रूपाने महाराष्ट्राला पहिला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला होता. यासोबतच संजय राऊत म्हणाले की, आमच्यासाठी जात महत्त्वाची नाही, काम आणि निष्ठा महत्त्वाची आहे.

राऊत म्हणाले, अंतुलेंबद्दल बाळासाहेबांना विशेष जिव्हाळा होता. महाराष्ट्रात शिवसेना सरकार स्थापन करणार होती, तेव्हा बाळासाहेबांना कोणता मुख्यमंत्री हवा, असा प्रश्न विचारण्यात आला होता. बाळासाहेब म्हणाले होते की, मला प्रशासकीय बाबींवर काम करणारा अंतुलेसारखा मुख्यमंत्री हवा आहे, जो तात्काळ निर्णय घेऊ शकतो.