नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत 20 मे पर्यंत वाढ


मुंबई – पुन्हा एकदा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीनंतर त्यांना २० मे पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नवाब मलिक यांना या अगोदर 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांना विशेष न्यायालयात हजर केले होते. नवाब मलिक यांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीकडून करण्यात आली होती. पण, आठ दिवसांचीच कोठडी न्यायालयाने मंजूर केली होती. आता त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.