देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ, पण सक्रिय रुग्णसंख्येत घसरण


नवी दिल्ली – गेल्या 24 तासांत देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत आणखी वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत गेल्या 24 तासांत 3545 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर सक्रिय प्रकरणांची संख्या कमी झाली आहे.

गुरुवारी, देशात 3275 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती, तर शुक्रवारी आणखी 270 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19,688 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत यात 31 ने घट झाली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत आणखी 27 लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. यासह, देशातील कोरोना आजाराने मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 5,24,002 वर पोहोचली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या 24 तासांत 3549 लोक या संसर्गातून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 4,25,51,248 लोकांनी साथीच्या रोगावर मात केली आहे.

सक्रिय प्रकरणांबद्दल बोलायचे झाले तर ते एकूण प्रकरणांपैकी 0.05 टक्के आहे. त्याच वेळी, पुनर्प्राप्ती दर 98.74 टक्के आहे. दैनंदिन सकारात्मकता दर 0.76 टक्के आहे, तर साप्ताहिक सकारात्मकता दर 0.79 टक्के आहे.