नवी दिल्ली – दिल्लीत 1 ऑक्टोबरपासून वीज सब्सिडीची मागणी करणाऱ्यांनाच वीज सब्सिडी मिळणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, तुम्हाला वीज सब्सिडी हवी आहे की नाही याचा पर्याय आम्ही लोकांना देऊ. ज्यांना नको आहे, त्यांना वीज सब्सिडी मिळणार नाही. म्हणजेच सर्वांना मोफत वीज मिळणार नाही. केजरीवाल म्हणाले की, आम्हाला वीज सब्सिडी नको असे म्हणणारे अनेक लोक भेटतात. हा पैसा तुम्ही शाळा उघडण्यासाठी, हॉस्पिटल बांधण्यासाठी वापरू शकता. त्यानंतर दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.