मुंबईत लाऊडस्पीकरसाठी मिळाली 24 मंदिरे आणि 950 मशिदींना परवानगी, मुंबई पोलिसांनी जाहीर केली आकडेवारी


मुंबई : लाऊडस्पीकरच्या मुद्यावरुन बुधवारी विविध समाजाच्या धार्मिक नेत्यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी पोलिसांनी सांगितले की, शहरातील 2400 मंदिरांपैकी आतापर्यंत केवळ 24 मंदिरांनी मंदिर परिसरात लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी मागितली होती.

मुंबई पोलिसांनी बुधवारी सांगितले की, शहरातील 2,400 पैकी केवळ 24 मंदिरांना लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी मिळाली आहे, तर एकूण 1,140 मशिदींपैकी 950 मशिदींना मान्यता दिली आहे.

मुंबई पोलिसांकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, महानगरातील केवळ एक टक्के मंदिरांनी त्यांच्या आवारात लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी घेतली आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तथापि, चर्च, गुरुद्वारा, बौद्ध मठ आणि ज्यूंची प्रार्थना स्थळे यांसारख्या इतर धार्मिक स्थळांद्वारे लाऊडस्पीकरच्या वापराबाबतची आकडेवारी पोलिसांकडून अद्याप गोळा केली जात आहे आणि या प्रार्थनास्थळांच्या व्यवस्थापनाला याची काळजी घ्यावी लागेल, लाऊडस्पीकरसाठी परवानगी घेणे अनिवार्य असेल.