विकिपीडियाने कश्मीर फाइल्सला म्हटले काल्पनिक, चुकीचा आणि षड्यंत्र सिद्धांताशी संबंधित चित्रपट, विवेक अग्निहोत्री संतापले


तुम्ही द काश्मीर फाइल्स हा 2022 सालातील सर्वात यशस्वी चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटाने अनेकांचे डोळे पाणावले. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेली रेकॉर्ड कमाई पुढील अनेक वर्षे स्मरणात राहील. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या विषयाबद्दल खूप बोलले आहेत. त्यांनी अनेकवेळा द्वेष करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तरही दिले आहे. विवेकने पुन्हा एकदा त्याच्या चित्रपटाचे समर्थन केले आहे.

विवेक अग्निहोत्री का भडकले?
विवेक अग्निहोत्री यांनी विकिपीडियावर तोंडसुख घेतले आहे. होय, विवेक अग्निहोत्री त्यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या विकिपीडियावरील वर्णनाच्या संपादनामुळे खूप नाराज आहेत. विकिपीडियाने त्याचा चित्रपट काल्पनिक, चुकीचा आणि षड्यंत्र सिद्धांताशी संबंधित चित्रपट असल्याचे वर्णन केल्यामुळे विवेक अग्निहोत्री भडकला आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी काय लिहिले ट्विटमध्ये ?
विकिपीडियावर काश्मीर फाइल्सच्या वर्णनाचा स्क्रीनशॉट शेअर करताना, विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले कि प्रिय विकिपीडिया, तुम्ही त्यात ‘इस्लामफोबिया प्रचार संघी इ.’ जोडण्यास विसरलात. तुम्ही तुमच्या सेक्युलर क्रेडेन्शियल्समध्ये अपयशी ठरत आहात. त्वरा करा, पुढे संपादित करा.


काश्मीर फाइल्सची सर्वोत्तम कमाई
काश्मीर फाइल्स 11 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना चित्रपट चांगलाच आवडला होता. कथेपासून ते अभिनेत्यांच्या उत्तम अभिनयापर्यंत सर्वच गोष्टींची प्रशंसा झाली. या सिनेमात अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती यांसारखे स्टार्स दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींची कमाई केली होती. चित्रपटाबाबत बरेच राजकारण झाले असले, या सर्व टीकेमध्येही या चित्रपटाने उत्तम कलेक्शन केले.

काश्मिरी पंडितांच्या व्यथा द काश्मीर फाइल्स या चित्रपटात दाखवण्यात आल्या होत्या. 1990 मध्ये त्यांना काश्मीरमधील घरातून कसे बेघर करण्यात आले. विवेक अग्निहोत्रीने 15 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटाने अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला. ज्याने हा चित्रपट पाहिला त्याच्या डोळ्यात पाणी आले.