वॉशिंग्टन – देशात आणि जगात आज उत्साहात ईद साजरी केली जात आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मुस्लिमांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. जगभरातील मुस्लिमांना हिंसाचाराचे शिकार बनवले जात आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले. मुस्लिम अमेरिकेला दिवसेंदिवस मजबूत करत आहेत. असे असूनही, त्यांना आव्हाने आणि अनेक धोके देखील आहेत.
ईदच्या दिवशी बायडन म्हणाले: मुस्लिम आहेत इस्लामोफोबियाचे बळी
व्हाईट हाऊसमध्ये ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान बायडन यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी प्रथम मुस्लिम राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. यादरम्यान बायडन म्हणाले, या दिवशी आपण त्या सर्वांची आठवण करु, जे हा दिवस साजरा करू शकत नाहीत. यावेळी त्यांच्या निशाणा उइगर आणि रोहिंग्या मुस्लिमांवर होता. त्यांना हिंसाचार आणि संघर्षांचा सामना करावा लागत आहे, असे ते म्हणाले.
अजून खूप काम करायचे आहे
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, सहा वर्षांत पहिल्यांदाच येमेनच्या लोकांना शांततेत ईद साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, तेथे आणि जगभरात बरेच काम करणे बाकी आहे. मुस्लिमांना अजूनही खरी आव्हाने आणि आपल्या समाजासमोरील धमक्यांचा सामना करावा लागतो, ज्यात लक्ष्यित हिंसा आणि इस्लामोफोबिया यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
एक कल्पना म्हणून संघटित आहोत आम्ही
बायडन पुढे म्हणाले, जगाच्या इतिहासात आपण असे एकमेव राष्ट्र आहोत, जे कोणत्याही धर्म, वंश, जात, भूगोलाच्या आधारावर नाही, तर एका कल्पनेच्या आधारे संघटित झालो आहोत. याआधी एका ट्विटमध्ये बायडन यांनी लिहिले होते की, जगभरात ईद साजरी करणाऱ्या सर्वांना मी शुभेच्छा देतो.