Met Gala 2022 : किम कार्दशियन, पीट डेव्हिडसनचा जलवा, तर 21 वर्षांनंतर परतल्या हिलरी क्लिंटन


मेट गाला, एक धर्मादाय फॅशन शो असून तो न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्च्युम इन्स्टिट्यूटमध्ये दरवर्षी आयोजित केला जातो. इव्हेंटचा सर्वात रोमांचक भाग म्हणजे जेव्हा सेलेब्स थीमनुसार त्यांचे सर्वोत्तम पोशाख घालून रेड कार्पेटवर चालतात. या वर्षी हिलरी क्लिंटन, जो जोनास, किम कार्दशियन, पीट डेव्हिडसन, नताशा पूनावाला, एलन मस्क यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी रॅम्प वॉक करत आपला ठसा उमटवला आहे. चला पाहूया छायाचित्रे…


हिलरी क्लिंटन
हिलरी क्लिंटन 21 वर्षांनंतर मेट गालामध्ये परतल्या आहे. क्लिंटन यांनी अमेरिकेच्या भूतकाळातील महिलांपासून प्रेरणा घेतली, ज्यांनी त्यांच्यावर प्रभाव टाकला. स्टार-स्टडेड इव्हेंटमध्ये त्यांनी मारून रंगाचा ऑफ-शोल्डर गाऊन परिधान केला होता.


जेरेड लेटो
जॅरेड लेटो आपल्या अनोख्या शैलीने चाहत्यांना प्रभावित करण्यात कधीच कमी पडत नाही. ‘मॉर्बियस’ स्टारने मेट गालामध्ये सर्वात अनोख्या पोशाखात सर्वांना थक्क केले. त्याचा पोशाख एक विज्ञान-कल्पित वातावरण देतो असे दिसते.


किम कार्दशियन आणि पीट डेव्हिडसन
किम कार्दशियन आणि पीट डेव्हिडसन यांनी मेट गाला 2022 मध्ये जोडपे म्हणून पदार्पण केले. नुकतेच व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स डिनरमध्ये त्यांचे नाते अधिकृत करणाऱ्या या जोडप्याने, मेट गाला रेड कार्पेटवर त्यांच्या फॅशनेबल आणि प्रेमाने भरलेल्या लुक्ससह गोष्टी अधिक उंचावण्याचा निर्णय घेतला, जिथे तुम्हाला जोडप्याची छायाचित्रे पाहता येतील.


कॅटी पेरी
कॅटी पेरी या वर्षी काळ्या आणि पांढऱ्या एक शोल्डर ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.


नताशा पूनावाला
उद्योजक नताशा पूनावाला हिने फॅशनच्या सर्वात मोठ्या रात्री – मेट गाला 2022 च्या रेड कार्पेटवर सब्यसाचीच्या सोनेरी साडीत वॉक केला.