मुंबई – केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने शनिवारी या बँक फसवणुकीप्रकरणी मोठी कारवाई केली. एजन्सीने मुंबई आणि पुण्यातील या प्रकरणाशी संबंधित संशयितांच्या आठ ठिकाणांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. या छाप्यात येथून अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी सीबीआयने अलीकडेच बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रियालाही अटक केली होती.
येस बँक फसवणूक: सीबीआयचे मुंबई-पुण्यात आठ ठिकाणी छापे
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी ही कारवाई केली आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विनोद गोयंका यांच्या घरावर छापे टाकण्यात आले असताना दुसरीकडे मुंबईतही केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी शाहिद बलवा आणि अविनाश भोसले यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर छापे टाकले आहेत.