यशच्या चित्रपटाने RRRला मागे टाकत केली एवढी कमाई, 1000 कोटींच्या क्लबमध्ये दाखल


कन्नड अभिनेता यश आता देशभरात सुपरस्टार बनला आहे. अभिनेत्याच्या KGF 2 चित्रपटाचे वादळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असतानाच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाने देशभरात खळबळ उडवून दिली आहे. यशच्या चित्रपटाचे लोकांना वेड लागले आहे. KGF 2 नंतर प्रेक्षक आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर निर्माते त्याचा तिसरा भाग बनवण्याच्या विचारात आहेत. KGF 2 रिलीज होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ झाला आहे, परंतु त्यानंतरही चित्रपटाची कमाई सुरूच आहे.

सुपरस्टार यश स्टारर या चित्रपटाने 16व्या दिवशीही चांगली कमाई केली. या चित्रपटाची कमाई आता थोडी कमी झाली असली तरी यानंतरही लोक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचत आहेत. नुकतेच समोर आलेले शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे बघता असे म्हणता येईल की चित्रपटाची चर्चा लोकांमध्ये अजूनही कायम आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने रिलीजच्या 16 व्या दिवशी देशभरात 7.30 कोटींची कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात एकूण 689.58 कोटींचा व्यवसाय केला आहे.

त्याचवेळी, जर आपण जगभरातील चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलयचे झाले तर, चित्रपटाने आतापर्यंत 16 दिवसांत जगभरात सुमारे 1007 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह यशच्या चित्रपटाने ज्युनियर एनटीआर आणि राम चरण स्टारर चित्रपट आरआरआरचा रेकॉर्ड देखील मोडला आहे, ज्याने 16 दिवसांत 1003 कमाई केली आहे. रिलीज झाल्यानंतर, KGF 2, ज्याने भरपूर कमाई केली, आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. यासोबतच 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेला हा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.

शुक्रवारच्या कमाईबद्दल बोलायचे झाले, तर यशच्या चित्रपटाने हिंदीत सुमारे 4.20 कोटींचा व्यवसाय केला. कन्नडमध्ये 1.50 कोटी रुपये, तेलगूमध्ये 40 लाख रुपये, तामिळमध्ये 1.50 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 50 लाख रुपये कमावले आहेत. चित्रपटाची कमाई पाहता हिंदीत चित्रपट अजूनही चांगली कमाई करत आहे, असे म्हणता येईल. अशा परिस्थितीत कन्नड अभिनेता यशची जादू आजही लोकांमध्ये कायम आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

चित्रपटाबद्दल बोलायचे तर, प्रशांत नील दिग्दर्शित KGF 2, 14 एप्रिल रोजी देशभरात प्रदर्शित झाला. हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलगू, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. यशशिवाय यात संजय दत्तही दिसला होता, ज्याने चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्याचा लूक लोकांना आवडला. याशिवाय KGF Chapter 2 मध्ये रवीना टंडन आणि प्रकाश राज देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.