इरफान खान: एक असा अभिनेता जो डोळ्यांनी करायचा अभिनय, त्याचे संवाद आजही जिवंत आहेत लोकांच्या हृदयात


इरफान खानची गणना इंडस्ट्रीतील सर्वात कुशल अभिनेत्यांमध्ये केली जाते. कॅन्सरमुळे बॉलिवूडचा सर्वात प्रतिभावान अभिनेता आता आपल्यासोबत नाही. या धोकादायक आजाराशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर 29 एप्रिल रोजी त्याने जगाचा निरोप घेतला. तो आता आपल्यात नाही पण त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तो आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्याने एकापेक्षा एक सरस कामगिरी केली आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या काही डायलॉग्सची आठवण ओळख करून देणार आहोत, जे आजही लोकांच्या हृदयावर राज्य करत आहेत.

चित्रपट – किलर
पिस्टल की ठंडी नली जब कनपटी पर लगती है न तब जिंदगी और मौत का फर्क समझ आता है

इरफानचा हा प्रसिद्ध संवाद द किलर या चित्रपटातील आहे. हा चित्रपट 2006 साली प्रदर्शित झाला होता. द किलरमध्ये त्याच्याशिवाय इमरान हाश्मी आणि निशा कोठारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

चित्रपट – हासिल
तुमको याद रखेंगे गुरु
हासिल चित्रपटातील हा जबरदस्त डायलॉग आजही लोक बोलतात. या चित्रपटात इरफानने जबरदस्त अभिनय केला होता. तिग्मांशु धुलियाचा हा चित्रपट आजही लोक पाहतात.

चित्रपट – लाइफ इन अ मेट्रो
ये शहर जितना हमें देता है, बदले में उससे कहीं ज्यादा हमसे ले लेता है

इरफान खानचा हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केले होते. संवादांसोबतच चित्रपटातील गाणीही चांगलीच हिट झाली होती.

चित्रपट – पिकू
डेथ और शिट, ये दो चीजें किसी को कहीं भी, कभी भी आ सकती हैं

पिकू हा चित्रपट इरफान खानच्या कारकिर्दीतील यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात तो दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता. चित्रपटाचा हा संवाद आजही लोकांना हसवतो.

चित्रपट – पान सिंग तोमर
बीहड़ में बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लियामेंट में

या चित्रपटात इरफान खानचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळाला. त्यांचा हा डायलॉग त्यावेळी चांगलाच गाजला होता.

चित्रपट – जज्बा
रिश्तों में भरोसा और मोबाइल पर नेटवर्क ना हो तो लोग गेम खेलने लगते हैं

जज्बा चित्रपटातील इरफान खानचे अनेक डायलॉग्स चर्चेत आले. त्यांच्या या डायलॉगवर आजही लोक सोशल मीडियावर रिल्स काढतात.

चित्रपट – हिंदी मीडियम
ये हेडमास्टर हेडमास्टर नहीं है जी, ये बिजनेसमैन है। आजकल की पढ़ाई पढ़ाई नहीं है जी, ये धंधा है धंधा

इरफान खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. चित्रपटातील त्याची कॉमिक टायमिंगही चांगलीच आवडली होती.

चित्रपट – साहेब, बीवी और गैंगस्टर रिटर्न्स
हमारी तो गाली पर भी ताली बजती है

इरफान खान त्याच्या वेगळ्या शैलीसाठी ओळखला जात होता. कोणत्याही चित्रपटात ते त्यांच्या संवादांनी प्राण फुंकायचे. साहेब बीवी और गँगस्टरचा हा डायलॉगही खूप गाजला होता.

चित्रपट – गुंडे
लकीरें बहुत अजीब होती हैं। खाल पे खिंच जाएं तो खून निकाल देती हैं और जमीन पर खिंच जाएं तो सरहदें बना देती हैं।

गुंडे या चित्रपटात रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरची जोडी दिसली होती, मात्र इरफानच्या उपस्थितीमुळे हा चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला. या चित्रपटातील त्यांच्या या संवादावर चित्रपटगृहांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

चित्रपट – डी-डे
सिर्फ इंसान गलत नहीं होते, वक्त भी गलत हो सकता है

इरफानचा हा संवाद डी-डे या चित्रपटातील आहे. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले होते. या चित्रपटात ऋषी कपूर, अर्जुन रामपाल, श्रुती हासन देखील दिसले होते.