पाटणा : चारा घोटाळ्याच्या दोरांडा ट्रेझरी प्रकरणात तुरुंगवास भोगत असलेले राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. यानंतर गुरुवारी रांचीच्या सीबीआय कोर्टानेही त्याच्या सुटकेचा आदेश जारी केला आहे. आता ते कधीही तुरुगांतून बाहेर येऊ शकतात.
रांची सीबीआय कोर्टाकडून लालूंच्या सुटकेचे आदेश जारी
तुरुंगवासाच्या काळात आजारी असलेले लालू प्रसाद यादव सध्या दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स, दिल्ली) येथे उपचार घेत आहेत. दिल्ली एम्समधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर लालू मुलगी मीसा भारतीच्या दिल्लीतील निवासस्थानी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तेथून ते 30 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत पाटणा येथे येऊ शकतात. ते बिहारमध्ये आल्याच्या चर्चेने येथील राजकारण तापताना दिसत आहे. नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांचे नेतृत्व स्वीकारले, तर त्यांचे स्वागतच आहे, असे मोठे वक्तव्य आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी केले आहे.