नवी दिल्ली – आरसीबीचा झंझावाती अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपल्या संघाची निराशा केली. आरसीबीने 37 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या आणि विराट कोहली आणि कर्णधार डू प्लेसिस पॅव्हेलियनमध्ये परतले होते. अशा परिस्थितीत संघाला मॅक्सवेलकडून खूप आशा होत्या, पण तो आला आणि निघून गेला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मॅक्सवेलला कुलदीप सेनने खातेही उघडू दिले नाही आणि तो गोल्डन डकवर बाद झाला. या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर, ग्लेन मॅक्सवेल हा आयपीएलमध्ये शून्यावर बाद होणारा आतापर्यंतच्या आयपीएलमधील परदेशी फलंदाज ठरला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा परदेशी खेळाडू बनला ग्लेन मॅक्सवेल, मोडला राशिद खानचा विक्रम
मॅक्सवेल राजस्थानविरुद्ध खाते न उघडता बाद झाला आणि आयपीएलमध्ये शून्यावर विकेट गमावण्याची त्याची 12वी वेळ होती. आता तो या लीगमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा परदेशी खेळाडू बनला आहे. मॅक्सवेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 11 वेळा शून्यावर बाद झालेला अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानला मागे टाकले आहे. आता परदेशी खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत राशिद खान दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर ग्लेन मॅक्सवेल पहिल्या क्रमांकावर आला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक शुन्यावर बाद झालेले शीर्ष 6 खेळाडू
- 12 – ग्लेन मॅक्सवेल
- 11 – राशिद खान
- 10 – सुनील नरेन
- 10 – एबी डिव्हिलियर्स
- 9 – ख्रिस मॉरिस
- 9 – जॅक कॅलिस