दिग्विजय सिंह यांचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले गरीब मुस्लिम मुलांना पैसे देऊन घडवली जाते दगडफेक


भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा भाजपवर हिंसाचार भडकावल्या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. दिग्विजय सिंह म्हणाले की, भाजपचे लोकच काही गरीब मुस्लिम मुलांना पैसे देऊन दगडफेक घडवून आणतात. आपल्याला यासंदर्भात तक्रारी येत असल्याचेही दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले. त्यांनी या तथ्यांची तपासणी केलेली नाही. लवकरच तपासणी केली जाईल. दिग्विजय सिंह दोन दिवसांच्या नीमच दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह सोमवारी रात्री नीमच जिल्ह्यातील जवाद विधानसभेच्या मोडी गावात पोहोचले होते. रात्रभर त्यांनी दलित कार्यकर्त्याच्या घरी विश्रांती घेतली. मंगळवारी सकाळी जनजागरण रॅलीत सहभागी झाले. यादरम्यान त्यांनी मोडी मातेचेही दर्शन घेतले. कार्यक्रमानंतर दिग्विजय सिंह यांनी पत्रकारांशी चर्चा करत भाजपवर गंभीर आरोप केले. याआधीही दिग्विजय सिंह यांनी खरगोन हिंसेबाबत भाजपवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

काही दिवसांपूर्वी त्यांनी एका ट्विटमध्ये भाजपवर जातीय दंगल पसरवल्याचा आरोप केला होता. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, भाजपला माहीत आहे की दगडफेक केल्याशिवाय खुर्ची मिळत नाही. यामुळे कधी भावना, तर कधी जीवन शस्त्र म्हणून वापरत आणावे. जातीय दंगल हे भाजपचे सर्वात घातक राजकीय हत्यार आहे. ज्या जिल्ह्यात दंगल होईल, त्याला सर्वस्वी जिल्हाधिकारी आणि एसपी जबाबदार असतील, हा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला, तर दंगल कधीच होऊ शकत नाही. माझ्या 10 वर्षांच्या कार्यकाळात एकही जातीय दंगल घडली नाही. त्याचवेळी, खरगोन हिंसाचाराबद्दल चुकीचे फोटो पोस्ट केल्याबद्दल भाजपने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

नरोत्तम मिश्रा यांनी दिले प्रत्युत्तर
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर पलटवार करत दिग्विजय सिंह यांना काय झाले, हे समजत नसल्याचे सांगितले. आधी तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी समाजाला खूश करण्यासाठी पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले, न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आणि आता त्या समाजाला केवळ विक्रीसाठी सांगितले की, ते पैसे घेऊन दगडफेक करतात. तुम्ही एक गोष्ट स्पष्ट केली की, दगड कुठून आले आणि कोणी फेकले. त्या समाजाने पैसे घेऊन दगडफेक केली याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुम्ही हे कोणाही व्यक्तीबद्दल बोलले असते, तर एवढे दुखावले नसते, पण तुम्ही समाजाला बदनाम करण्याचे काम केले आहे. ते देखील या पवित्र महिन्यात, आपण चांगले काम केले नाही.

विश्वास सारंग म्हणाले- दिग्विजय यांच्या अक्कलेत पडले आहेत धोंडे
दिग्विजय सिंह यांच्या अक्कलेत दगड-धोंडे पडले असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास कैलाश सारंग यांनी म्हटले आहे. या कारणास्तव ते दररोज बेजबाबदारपणे बोलून समाजात भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असे ज्येष्ठ नेते धर्माची लढाई धर्माशी लढविण्याचे बोलत आहेत. त्यांना म्हणायचे आहे की मुस्लिम विक्रीसाठी आहेत. तसेच एफआयआर होण्याच्या भीतीने त्यांनी विधान मागे घेतले. तथ्य नसताना आरोप करणे. भाजप हा समाज तोडत नसून संघटित करणारा पक्ष आहे. दंगल घडवून आणणे हे काँग्रेसचे काम आहे.