कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलावली मुख्यमंत्र्यांची बैठक


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीबाबत गंभीर झाले आहेत. त्यांनी बुधवारी दुपारी १२ वाजता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधुन परिस्थितीची माहिती घेतील. माहितीनुसार, या बैठकीनंतर कोरोना रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.

मंगळवारी देशभरात कोरोनाचे 2483 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे देशात आतापर्यंत 43062569 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे, तर येथे सकारात्मकता दर 6 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृतांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.