6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाणार कोव्हॅक्सिन, DCGI ने दिली मान्यता


नवी दिल्ली: ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने आज 6-12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या मर्यादित वापरास परवानगी दिली आहे. DCGI ने लस उत्पादका कंपनीला पहिल्या दोन महिन्यांसाठी दर 15 दिवसांनी योग्य विश्लेषणासह प्रतिकूल घटनांच्या डेटासह सुरक्षितता डेटा सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत.

यासंदर्भात आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले आहे, ज्यात त्यांनी लिहिले आहे की, कोरोनाशी भारताची लढाई आता मजबूत झाली आहे. 6 ते 12 वयोगटासाठी ‘कोव्हॅक्सिन’चे दोन डोस, 5 ते <12 वयोगटासाठी 'कॉर्बेव्हॅक्स' आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी 'ZyCoV-D' मंजूर करण्यात आले आहेत.