इंस्टाग्रामच्या टॉप 5 अभिनेता/अभिनेत्रीच्या यादीत आलिया भट्ट एकमेव भारतीय आणि आशियाई अभिनेत्री


गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील अभिनय आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न झाल्यानंतर आलिया भट्टची लोकप्रियता खूप वाढली आहे. परिणामी आलिया भट्टचे नाव इंस्टाग्रामच्या टॉप 5 अभिनेता/अभिनेत्रीच्या यादीत समाविष्ट झाले आहे. या यादीत सामील होणारी ती एकमेव भारतीय आणि आशियाई अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे आलिया भट्ट लवकरच ‘हार्ट ऑफ स्टोन’मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

आलिया भट्ट निःसंशयपणे आपल्या देशातील प्रसिद्ध महिला अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका करण्याव्यतिरिक्त, आलिया भट्ट RRR आणि तिच्या स्वत: च्या निर्मिती संस्थेत (Eternal Sunshine Productions) देखील काम करत आहे. यामुळेच सोशल मीडिया यूजर्सना आलिया भट्टच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते.