हिरोपंती 2 साठी टायगर श्रॉफने केले खडतर स्टंट


बॉलीवूडमधील अशा कलाकारांपैकी एक टायगर श्रॉफ आहे, जो केवळ आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत नाही, तर चित्रपटांमध्ये स्वतःचे स्टंट देखील करतो. टायगर श्रॉफ मार्शल आर्ट्समध्ये देखील तरबेज आहे. बागी, ​​बागी 2 आणि हिरोपंती सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दमदार अ‍ॅक्शनने सर्वांची मने जिंकणारा टायगर आता पुन्हा एकदा साजिद नाडियादवालाच्या ‘हिरोपंती’ चित्रपटात आपली दमदार अ‍ॅक्शन दाखवणार आहे. नुकताच टायगर सर्वात कठीण स्टंटबद्दल बोलला.

टायगरने या चित्रपटामध्ये त्याच्या अ‍ॅक्शनची पातळी आणखी वाढवली आहे. चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्सबद्दलचा आपला अनुभव सांगताना टायगर म्हणाला, धुळीपासून उन्हाळ्यापर्यंत, जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो, तेव्हा माझ्या शरीरावर सर्व काही होते, सुरुवातीला माझ्यासाठी ते अस्वस्थ होते. अनेक अडचणी आल्या, पण शेवटी मला माझी एक चांगली शॉर्ट मिळाली. मी माझ्या शॉर्टमध्ये खूप आनंदी आहे, कारण मी याआधी असे काहीही केले नव्हते.

टायगर श्रॉफने त्याच्या स्टंटवर पुढे खुलासा केला की, सरफेस खूप निसरडा होता, ट्रेन धावत होती आणि मला हिरोसारखी पोज द्यावी लागणार होती. परफॉर्म करणे सोपे होते असे मी म्हणणार नाही. हिरोपंती नंतर आता टायगर श्रॉफ हिरोपंती 2 मध्ये त्याची ‘बबलू’ व्यक्तिरेखा पुढे नेताना दिसणार आहे, पण या चित्रपटात काहीतरी वेगळे पाहायला मिळणार आहे. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि टायगर श्रॉफ गुन्हेगारी रोखण्यासाठी एकमेकांशी भांडताना दिसणार आहेत.

29 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये Heropanti 2 प्रदर्शित होत आहे. टायगर श्रॉफ आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याशिवाय या चित्रपटात तारा सुतारिया देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टायगर बबलू आणि नवाज लैलाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर तारा इनायाच्या भूमिकेत दिसणार आहे. अहमद खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अहमद आणि टायगरची जोडी यापूर्वी बागी 2 आणि बागी 3 सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली आहे. चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेते आणि गायक ए आर रहमान यांनी दिले असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे.