हा आहे जगातील सर्वात महागडा शेअर

शेअर बाजाराबद्दल आपण नेहमी ऐकतो. भारतात गुंतवणूक करणाऱ्यांच्या मोठ्या संख्येचे आजपर्यंत बँक ठेवी, मालमत्ता यांना प्राधान्य होते पण आजकाल अनेकांचे लक्ष शेअर गुंतवणुकीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. त्यातही कमी धोका, चांगला नफा आणि कमी किमतीच्या शेअर्सना मुख्यतः प्राधान्य देण्याकडे अधिक कल आहे.

पण आज स्टॉक मार्केट मध्ये कोट्यावधीची किंमत असलेले शेअर्स सुद्धा आहेत. जगातील सर्वात महाग शेअरची किंमत प्रतीशेअर ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यांचे नाव आहे बर्कशायर हॅथवे इंक. या कंपनीचे मालक आहे प्रसिद्ध गुंतवणूकदार वारेन बफे. या शेअरची सध्याची किंमत ५२,३५,५० डॉलर्स प्रती शेअर आहे. ज्यांच्या कडे अगणित संपत्ती आहे तोच या शेअर खरेदीचा विचार करू शकतो असे म्हणतात.

वॉरेन स्वत या कंपनीचे १६ टक्के हिस्सेदार आहेत. फोर्ब्सच्या माहितीनुसार १९६५ मध्ये वॉरेन जेव्हा या कंपनीशी जोडले तेव्हा या कंपनीच्या एका शेअरची किंमत होती २० डॉलर्स.