मिस्टर अँड मिसेस कपूर तोडणार हे रेकॉर्ड

१४ एप्रिल रोजी मिस्टर आणि मिसेस कपूर अश्या नव्या नात्यात प्रवेश केलेले आलीया भट्ट आणि रणबीर कपूर एक नवे रेकॉर्ड बनविण्याच्या तयारीत आहेत. वास्तू या आपल्या राहत्या इमारतीत सात फेरे घेतलेल्या आलीय रणबीर यांच्या वेडिंग फोटोना त्यांच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या २४ तासात या फोटोना मिळालेल्या लाईक्सची संख्या १ कोटींच्या वर गेली आहे. पहिल्या १२ तासातच या फोटोना ९५ लाख लाईक्स मिळाले होते.

डिसेंबर मध्ये विवाहबद्ध झालेले विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे वेडिंग फोटो असेच गाजले होते आणि या फोटोना मिळालेल्या लाईक्सचे रेकॉर्ड बनले होते. त्यांच्या वेडिंग फोटोना १ कोटी २७ लाख लाईक्स मिळाले होते. पण आलीया रणबीर वेडिंग फोटो लाईक्स नवे’’ सेलेब वेडिंग फोटो लाईक्स’ रेकॉर्ड करेल अशी लक्षणे दिसत आहेत.

यापूर्वी गाजलेल्या सेलेब विवाहामध्ये दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग यांच्या फोटोना ६५ लाख लाईक मिळाले होते. प्रियांका निक जोनास यांच्या वेडिंग फोटो साठी हीच संख्या ५४ लाख, नेहा कक्कड, रोहनप्रीत यांच्या फोटो साठी ३९ लाख, तर अनुष्का –विराट कोहली साठी हीच संख्या ३४ लाख होती.