मस्क यांच्या ट्वीटर खरेदी ऑफर मध्ये सौदी राजकुमाराने घातला खोडा
ट्वीटर हा अमेरिकन सोशल मिडिया प्लॅटफॉर्म खरेदी करण्यासाठी ट्वीटरची ९.२ टक्के भागीदारी खरेदी केलेल्या एलोन मस्क यांनी संपूर्ण कंपनी ४३ अब्ज डॉलर्स मध्ये खरेदी करण्याची ऑफर दिली असली तरी मस्क यांच्या या मनसुब्यावर ट्वीटर मध्ये मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी राजकुमार अल वलीद बिन तलाल अल सौद यांनी पाणी फिरवले आहे. त्यांच्या किंगडम होल्डिंग कंपनीची ट्वीटर मध्ये मोठी गुंतवणूक आहे.
राजकुमार तलाल यांच्या म्हणण्यानुसार मस्क ट्वीटर मधील सर्वात मोठा हिस्सा असणारे गुंतवणूकदार नाहीत. तलाल यांनी केलेल्या ट्वीट नुसार मस्क यांनी ५४.२० डॉलर्स प्रती शेअरने ट्वीटरचे सर्व शेअर खरेदीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र ट्वीटरची भविष्यातली वाढ आणि विकास पाहिला तर ही ऑफर त्या किमतीच्या कुठे जवळपास सुद्धा नाही. तलाल म्हणतात, मी दीर्घकाळाचा ट्वीटरचा मोठा शेअर होल्डर आहे. मस्क यांची ऑफर आम्हाला मान्य नाही.
ज्या किंगडम होल्डिंगचा ट्वीटर मध्ये मोठा हिस्सा आहे त्या कंपनीची मालकी तलाल यांच्याकडे आहे. मस्क यांनी तलाल यांना दोन प्रश्न विचारले आहेत. तुमची ट्वीटर मध्ये प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष गुंतवणूक किती असा पहिला प्रश्न असून दुसरा प्रश्न सौदीचे प्रेस स्वातंत्र्यबद्दल काय विचार आहेत असा आहे.
सौदी मध्ये प्रेस स्वातंत्र जवळजवळ नाहीच आणि पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येच्या प्रकरणी सौदीचे नाव यापूर्वीच आले आहे.