म्हणून येते खाज

जगात अगदी नवजात बालकापासून सर्वात वयोवृद्ध माणसापर्यंत सर्वाना खाज सुटते. खाज येणे ही अगदी सर्वसामान्य बाब आहे. खाज कधी येईल, शरीराच्या कुठल्या भागात येईल हे सांगणे अवघड आहे पण खाज सुटली आणि खाजवले कि बरे वाटते हा अनुभव सार्वत्रिक आहे. कधीही आणि कुठेही येणाऱ्या या खाजेच्या बाबत काही महत्वपूर्ण बाबी अनेकांना माहिती नाहीत. त्या जेवढ्या माहितीपूर्ण आहेत तेवढ्याच मनोरंजक सुद्धा आहेत.

लिव्हरपूल मधील प्रोफेसर फ्रान्सिस मॅक्लोन यांनी असा शोध लावला आहे कि एका व्यक्तीला दिवसभरात सरासरी ९७ वेळा खाज येते. अनेक प्रकारची झाडे झुडपे, पराग कण, किडे, कीटक त्वचेवर पडले की त्यातून काही विशिष्ठ प्रकारची रसायने त्वचेवर पडतात. या रसायनांना प्रतिकार करण्यासाठी  शरीराची प्रतिकार शक्ती कार्यान्वित होते आणि हिस्टेमिया नावाचे एक द्रव स्त्रवू लागतो. यामुळे खाज येते. अनेकदा कीटक, डास, मधमाश्या चावे घेतात तेव्हा त्यांच्या लाळेतून काही रसायने शरीरात जातात आणि त्यामुळे खाज सुटते.

अमेरिकन वैज्ञानिक जे आर ट्रेवर यांनी तब्बल ४० वर्षे खाज या विषयावर संशोधन केले. खाजेचे कारण शोधण्यासाठी ते काम करत होते. त्यांना इतकी खाज सुटायची कि त्यांची त्वचा खाजवून खाजवून फाटली होती. त्या त्वचेचे तुकडे त्यांनी मोठ्या वैज्ञानिकांकडे संशोधनासाठी पाठविले होते. या संशोधनावर ट्रेवर यांनी एक रिसर्च पेपर प्रकाशित केला होता. १९४८ मध्ये अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठानेही एक रिसर्च पेपर प्रकाशित केला होता.

यानुसार खाज सुटली कि व्यक्ती स्वतःला जोरजोरात खाजवून त्रास करून घेते पण त्यामुळे त्या व्यक्तीला रिलीफ मिळतो असा या संशोधनाचा निष्कर्ष होता. सर्वप्रथम खाज ही समस्या असल्याचे १६ व्या शतकात जर्मन फिजिशियनने जगासमोर आणले होते असे म्हणतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही