विरोधी पक्षाविना आहे पाकिस्तानची संसद

पाकिस्तान संसदेचे उपसभापती आणि संसदेचे कार्यवाहक अध्यक्ष कासीम सुरी यांनी इम्रान खान यांच्या तेहरिक ए इन्साफ पक्षाच्या १२३ खासदारांचा राजीनामा स्वीकारल्याची अधिसूचना जारी केल्यानंतर पाकिस्तान संसदेत सध्या विरोधी पक्षाचे अस्तित्व उरलेले नाही. त्यामुळे आता सार्वत्रिक निवडणूक घेणे अपरिहार्य ठरले आहे.

इम्रान खान सरकार पडल्यावर वास्तविक इम्रान खान यांच्याच पक्षाला विरोधी पक्ष म्हणून काम करायचे होते. पाकिस्तान संसदेत एकूण २७२ खासदार असून तेहरिक ए इन्साफ पक्षाचे १५५ खासदार होते. पण त्यातील २० अगोदरच बंडखोरी करून विरोधी पक्षाला जाऊन मिळाले होते आणि त्यांनीच इम्रान खान यांच्या पक्षाला नोटीस जारी केली होती. अन्य १२ खासदारांनी कोणतीच स्पष्ट भूमिका घेतली नव्हती.

या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी लिहीलेल्या पत्रात पाकिस्तानच्या अंतर्गत बाबी आणि त्यासंदर्भातील घटना व परिस्थिती यामागे विदेशी हस्तक्षेप होत असल्याचे म्हटले होते. त्यांचा पक्ष नव्या सरकारच्या गठण प्रक्रियेचा हिस्सा बनणार नाही असे स्पष्ट केल्याने संसदेत आता त्यांच्या पक्षाचा एकही प्रतिनिधी नाही असे समजते.