मोटो जी २२ चा आज भारतात पहिला सेल

मोटोरोला मोटो जी २२ आज प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध केला गेला असून दुपारी १२ वा. भारतात सेलची सुरवात होत आहे.  ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरीयंटची किंमत १०९९९ रुपये आहे. मोटोरोला इंडिया ऑनलाईन स्टोर मधून हा लेटेस्ट किफायती स्मार्टफोन ग्राहक खरेदी करू शकतील.कॉस्मिक ब्लॅक, आयबर्ग ब्ल्यू आणि पर्ल व्हाईट अश्या तीन रंगात हा फोन उपलब्ध आहे.

या फोनसाठी ६.५ इंची फुल एचडी मॅक्स व्हिजन डिस्प्ले दिला गेला आहे. अँड्राईड १२ ओएस असून मायक्रोएसडी कार्ड च्या सहाय्याने मेमरी वाढविता येणार आहे. फोन मध्ये मिडिया टेक हिलीयो चिपसेट आहे. क्वाड कॅमेरा सेटअप मध्ये ५० एमपीचा प्रायमरी कॅमेरा, ८ एमपीचे अल्ट्रा वाईड, २ एमपीचे डेप्थ आणि २ एमपीचे मॅक्रो सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी १६ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. फोन ला ५ हजार एमएएचची बॅटरी दिली गेली आहे.