ऑरेंज कॅप रेस मध्ये गब्बरची एन्ट्री
पंजाब किंग्सचा धडाकेबाज सलामी फलंदाज शिखर धवन उर्फ गब्बरने मुंबई इंडियन्स विरुद्ध ७० धावा ठोकून ऑरेंज कॅप रेस मध्ये टॉप तीन मध्ये जागा मिळविली आहे. धमाकेदार इनिंग खेळताना शिखरने आत्तापर्यंत १९७ धावा ठोकून ऑरेंज कॅप रेस मध्ये तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आता त्याच्या पुढे फक्त राजस्थान रॉयल्सचा सलामी फलंदाज जोस बट्लर व चेन्नई सुपरकिंग्सचा शिवम दुबे आहेत. बट्लर २१८ रन्स सह टॉप पोझिशनवर आहे तर शिवम २०७ रन्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.
ऑरेंज कॅप रेस मध्ये पहिल्या पाच मध्ये शिखर नंतर रोबिन उत्धप्पा १९४ रन्स व क्विन्टन डीकॉक १८८ रन्स सह चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. नुकत्याच खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादव याने ४३ धावा काढून ऑरेंज कॅप टॉप १० मध्ये जागा मिळविली आहे. मात्र पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला सलग पाचवा पराभव स्वीकारावा लागला आहे आणि टेबल पॉइंट मध्ये त्यांची जागा शेवट म्हणजे १० वी आहे. आत्तापर्यंत हा संघ एकही विजय मिळवू शकलेला नाही.