ओप्पो एफ २१ प्रो, मिडरेंज लेटेस्ट फोन लाँच

ओप्पोने भारतात त्यांचा एफ २१ प्रो हा लेटेस्ट मिडरेंज फोन सादर केला असून याचबरोबर एफ २१ प्रो फाईव्ह जी फोन सुद्धा सादर केला आहे. एफ २१ प्रो साठी ग्राहकाला २२९९९ रुपये मोजावे लागतील तर एफ २१ प्रो फाईव्ह जी साठी ग्राहकाला २६९९९ रुपये मोजावे लागणार आहेत. एफ २१ प्रो फोर जीची विक्री १५ एप्रिल पासून तर फाईव्ह जीची विक्री २१ एप्रिल पासून सुरु होत आहे. सुरवातीला या फोनवर १० टक्के कॅशबॅक तसेच नो कॉस्ट ईएमआय पर्याय दिला गेला आहे.

फीचर्सच्या दृष्टीने या दोन फोन मध्ये फारसा फरक नाही. एफ २१ प्रो ला ६.४ इंची फुल एचडी अमोलेड डिस्प्ले, ८ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, आणि ३३ डब्ल्यू सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट सह आहे. त्याला ४५०० एएमआयची बॅटरी दिली गेली आहे. रिअर ला ६४ एमपीचा प्रायमरी कॅमेरा आणि २ एमपीचे दोन सेन्सर आहेत. फ्रंटला ३२ एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. अँड्राईड १२ ओएस आहे.

कॉस्मिक ब्ल्यू आणि रेनबो स्पेक्ट्रम शेड्स मध्ये हे फोन उपलब्ध आहेत.