येथे बनतेय देशातील मोठे रोबो आणि आयटी हब

उत्तर प्रदेशच्या गौतमबुद्ध नगर मध्ये लवकरच देशातील मोठे रोबो आणि आयटी हब तयार होत आहे. योगी सरकारने नवीन औद्योगिक क्रांती मोहिमेची घोषणा केल्यापासून देश विदेशातील बडे गुंतवणूकदार येथे उत्पादन प्रकल्प उभारू लागले आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि एमएक्यू अश्या बड्या कंपन्या थेथे डेटा सेंटर स्थापन करत असून रोबो बनविण्यासाठी अनेक प्रसिध्द कंपन्या कारखाने सुरु करत आहेत. येथे वर्षाला पाच लाख रोबो तयार होतील असे समजते. या कंपन्यांनी गेल्या महिन्यात येथे जमिनी खरेदी केल्या असून त्यामुळे ग्रेटर नॉइडा भागात १२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होत आहे.

देशातील या सर्वात मोठ्या हब मध्ये जगातील मोठ्या रोबो फॅक्टरीने जमीन खरेदी केली असून चार वर्षात येथे ५०० कोटींची गुंतवणूक होत आहे. कंपनीचे सह संस्थापक सतीश शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे दरवर्षी ५ लाख रोबो तयार होतील. २०२१ मध्ये कंपनीने १५६ एकर जागेत प्रकल्प सुरु केला असून येथे निर्माण होत असलेले रोबो भारत, युरोपीय देशातील वेअरहाउस, कारखाने, मॉल मध्ये कार्यान्वित आहेत. दोन किलो पासून दोन टन पर्यंत वजन उचलण्यासाठी या रोबोंचा वापर होत आहे. हॉस्पिटल मध्ये चाचण्या करण्यासाठी सुद्धा रोबो वापरले जात आहे.

मोबाईल पार्ट उत्पादक एलेनटेक इंडियाने येथे १ हजार कोटींची गुंतवणूक केली असल्याचे सुद्धा सांगितले जात आहे.