इतकी आहे आलीया आणि रणबीरची संपत्ती

बॉलीवूड जोडी रणबीर आणि आलीया यांच्या विवाह तारखेचा घोळ अजून सुरु असला तरी या आठवड्यात ते नक्कीच सात फेरे घेणार हे आता निश्चित झाले आहे. त्यासाठी जोरात तयारी सुरु आहे आणि त्यांच्या घरांवर रोषणाई केली गेली आहे. अश्या वेळी या दोघांच्या चाहत्यांना आलिया आणि रणबीर यांचे एकूण राहणीमान, त्यांची संपत्ती, त्यांच्या कार्स याविषयी विशेष कुतूहल वाटते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रणबीर आणि आलिया या दोघांचे ‘वास्तू’ या इमारती मध्ये स्वतंत्र अलिशान फ्लॅटस आहेतच पण दोघांकडेही अनेक अलिशान कार्स आहेत. रणबीर ची एकूण संपत्ती ३३७ कोटी आहे आणि एका चित्रपटासाठी तो ५० कोटी रुपये घेतो असे सांगितले जाते. २०१२ मध्ये बॉलीवूड डेब्यू केलेल्या आलीयाची संपत्ती १५८ कोटी असून एका चित्रपटासाठी ती ५ ते ८ कोटी तर जाहिरातीसाठी २ कोटी मानधन घेते. म्हणजे दोघांची मिळून एकूण संपत्ती ५०० कोटी पेक्षा जास्त आहे.

या दोघांना महागड्या गाड्यांचा शौक आहे. आलियाकडे ऑडी क्यू ७, ऑडी क्यू ५, ए ६, बीएमडब्ल्यू ७ सिरीज, लँडरोव्हर, रेंज रोवर अश्या कार्स आहेत तर रणबीरकडे रेंज रोव्हर वोग, ऑडी आर ८, मर्सिडीज जी ६३, रेंज रोव्हर स्पोर्ट या कार्स आहेत.