पाकिस्तानचे नवे पंतप्रधान आहेत श्रीमंत आणि रोमँटिक

पाकिस्तानी सेनेच्या बळावर पंतप्रधान बनलेल्या इम्रानखान यांची खुर्ची गेल्यावर त्यांच्या जागी पाकिस्तान मुस्लीम लीगचे अध्यक्ष शाहबाज नवाझ यांची नियुक्ती झाली आहे. शहाबाज हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे छोटे भाऊ आहेत. शहाबाज यांची संपत्ती २८ वर्षांच्या राजकीय जीवनात २० लाखांवरून ७०० कोटींपेक्षा अधिक झाली आहेच पण हे नवे पंतप्रधान रोमँटिक म्हणूनही ओळखले जातात.

शहाबाज खान यांची पाच लग्ने झाली आहेत. पैकी तीन जणींनी घटस्फोट घेतला आहे तर दोघी त्यांच्याजवळ राहतात. त्यांची पहिली पत्नी बेगम नुसरत यांच्याशी १९७३ मध्ये विवाह झाला होता आणि १९९३ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आहे. शहाबाज यांची दुसरी पत्नी आलीया हनी हिच्याबरोबरचा विवाह नवाझ शरीफ यांना पसंत नव्हता. पण या पत्नीवर शहाबाज यांचे इतके प्रेम होते कि तिला घरी येण्यास उशीर होऊ नये म्हणून त्यांनी पंजाब प्रांतात एक फ्लायओव्हर बांधल्याचे सांगितले जाते. या फ्लायओव्हरला ‘हनी ब्रिज’ याच नावाने ओळखले जाते. पहिल्या पत्नीपासून त्यांना पाच मुले आहेत.

शाहबाज यांनी निलोफर खोसा यांच्याबरोबर तिसरा, तेह्सीन दुर्रानी यांच्याबरोबर चौथा तर कलसुम हया यांच्याबरोबर पाचवा विवाह केला आहे. पैकी तेह्सीन यांच्याबरोबर त्यांनी गुपचूप विवाह केला होता. सध्या नुसरत आणि तेहमिन शाहबाज यांच्यासोबत आहेत. शहाबाज यांचे भारताशी नाते आहे. त्यांचे मूळ गाव अमृतसर जवळील जाटी उमरा हे असून त्यांच्या आई पुलवामाच्या रहिवासी होत्या. फाळणीनंतर हा परिवार पाकिस्तान मध्ये गेला.

गेल्या २८ वर्षात शहाबाज यांनी अगणित संपत्ती जमविली आहे. मनी लाँड्रींगचे आरोप त्यांच्यावर केले गेले आहेत. सध्या त्यांची संपत्ती ७३२.८ कोटी असल्याचे बोलले जाते. त्यांचे भाऊ नवाझ शरीफ यांची संपत्ती १.६ अब्ज डॉलर्स म्हणजे १६० कोटी डॉलर्स आहे.