आली स्वदेशी फोल्डेबल इलेक्ट्रिक सायकल-हॉर्नबॅक

हैद्राबादच्या ई मोबिलिटी स्टार्टअप काचबो डिझाईनने वेगळीच ई सायकल आणली असून ही फोल्डेबल आहे. हॉर्नबॅक  असे या सायकलचे नामकरण केले गेले आहे. ही रेग्युलर बॅटरी फिटेड सायकल प्रमाणेच आहे पण ती कारच्या बूट स्पेसमध्ये सहज घालून कुठेही नेता येते.

ताशी २५ किमी वेगाने ही सायकल चालते आणि एका चार्ज मध्ये ३० किमी अंतर कापते. हैद्राबाद चेन्नई रोडवर चार दिवस या सायकलचे टेस्टिंग केले गेले आहे. सायकलची किंमत किती असेल याची घोषणा अजून केली गेली नाही मात्र कंपनीच्या वेबसाईटच्या माधमातून ५०० रुपये भरून तिचे बुकिंग करता येणार असल्याचे जाहीर केले गेले आहे. सायकलची डिलिव्हरी सप्टेंबर पासून दिली जाणार आहे.

या सायकलचे डिझाईन असे आहे की तिचा वापर ट्रॉली सारखा करून ती इकडेतिकडे नेता येते. सायकलच्या बॅटरी वर आणखी काम केले जात असून त्यामुळे सायकलचे वजन आणखी कमी होणार आहे असे समजते. ही सायकल अश्या प्रकारे बनविली गेली आहे की, फोल्ड केली तर मारुती सुझुकी अल्टो सारख्या छोट्या गाडीच्या बूटस्पेस मध्ये सुद्धा ती सहज मावते. या सायकलला आणखी काही स्मार्ट फीचर्स जोडली जाणार आहेत असे उत्पादकांचे म्हणणे आहे.