बोरिस बेकरला होऊ शकतो तुरुंगवास

महान टेनिस खेळाडू बोरिस बेकर दिवाळखोर जाहीर झाल्यानंतर सुद्धा त्याने बँकेतून बेकायदा हजारो डॉलर्स ट्रान्स्फर केल्या प्रकरणात आणि अन्य काही केसेस मध्ये न्यायालयाने त्याला दोषी ठरविले असून त्यामुळे त्याला तुरुंगवास भोगावा लागू शकेल असे समजते. लंडनच्या साउथवोर्क न्यायालयातील ज्युरीनी शुक्रवारी बेकरने दिवाळखोर नियम मोडल्याबद्दल चार आरोपात त्याला दोषी ठरविले आहे तर अन्य २० केसेस मध्ये त्याला निर्दोष ठरविले आहे.

दिवाळखोर जाहीर झाल्यावर बँकेतून पैसे ट्रान्स्फर करणे, कर्ज लपविणे, संपत्तीचा खुलासा न करणे आणि अन्य एका आरोपात बेकर ला दोषी ठरविले गेले आहे.  जून २०१७ मध्ये बेकरला दिवाळखोर ठरविले गेले होते. त्यानंतर त्याने अन्य खात्यात हजारो पौंड ट्रान्स्फर केले होते. त्यात त्याची माजी पत्नी बार्बरा व शर्ली लिलिया सामील आहेत. त्यांनी जर्मनी मधील संपत्ती घोषित केली नाही, तंत्रफर्म मधून ८२५००० युरो बँक कर्ज व शेअर्स माहिती न देता लपविले असा आरोप सिध्द झाला आहे.

बोरीसने सहा वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविले आहे. त्याने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. बोरिसने पहिले विम्बल्डन विजेतेपद १९८६ मध्ये अवघ्या १७ व्या वर्षी जिंकले होते,१९८९ मध्ये त्याने पुन्हा हे विजेतेपद जिंकले. १९९१ आणि १९९६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद,१९८९ मध्न्ये युएस ओपन विजेतेपद आणि १९९२ मध्ये डबल्स ऑलिम्पिक गोल्ड विजेतेपद त्यांच्या नावावर आहे. त्याने ४९ सिंगल्स खिताब जिंकले आहेत.