गुड्डी जया बच्चन यांचे ७५ व्या वर्षात पदार्पण- इतकी आहे संपत्ती
९ एप्रिल १९४८ मध्ये जन्मलेल्या आणि बॉलीवूड मध्ये गुड्डी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जया बच्चन आज वयाच्या पंच्याहत्तरी मध्ये पदार्पण करत आहेत. हिंदी सिनेमा गाजविल्यावर त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मोठे यश मिळविले आहे. सध्या त्या समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार आहेत. जया यांच्या यशाचा साऱ्या बच्चन कुटुंबाला मोठा अभिमान आहे असे सांगितले जाते. त्या चांगली पत्नी, चांगली माता आणि चांगली आजी अश्या सर्व भूमिकात यशस्वी ठरल्या आहेत.
जया यांच्या मालकीची संपत्ती किती असावी याची अनेकांना उत्सुकता आहे. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या जया यांनी जेव्हा अभिनय क्षेत्र निवडले तेव्हा प्रथम पुण्याच्या फिल्म इन्स्टीटयूट मधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते.त्या फिल्म इंस्टीटयूटच्या गोल्ड मेडलीस्ट आहेत. त्यांना चित्रपटात प्रसिद्धी मिळाली ती गुड्डी मधील भूमिकेमुळे. उपहार, कोशिश, कोरा कागज, शोले, मिली, चुपके चुपके असे अनेक हिट चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. १९७३ मध्ये विवाह झाल्यावर त्यांनी चित्रपट संन्यास घेतला आणि समाजवादी पक्षातून राजकीय कारकीर्द सुरु केली.
निवडणूक अर्जात भरलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे १०.०१अब्ज रुपयांची संपत्ती आहे. बँकेकडून त्यांच्या नावावर ८८ कोटींचे कर्ज आहे. ६७,७९,३१,५४६ रुपये त्यांची संपत्ती असून २६ कोटी ११ लाखाचे दागिने, ८ लाख ७५ हर किमतीचे वाहन, दुबई बँकेत ६ कोटी ६० लाख आणि ३७ कोटी २५ लाख किमतीची शेतजमीन आहे. अर्थात हे आकडे पूर्वीचे असून त्यात आता बरीच भर पडल्याचे सांगितले जाते.