किया भारतात आणतेय पहिली इव्ही
किआ इंडिया भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कोरियाई कार उत्पादक कंपनीच्या सध्या भारतात सोनेट, सेल्तोज, कार्निव्हल व कॅरेन या चार पेट्रोल डीझेल व्हर्जनच्या कार्स बाजारात आहेत. गोल्बल मार्केट मध्ये त्यांच्या सहा इलेक्ट्रिक कार्स असून भारतात पहिली कार टेस्टिंग दरम्यान स्पॉट केली गेली आहे. या कारची स्पाय इमेज हैद्राबादच्या रस्त्यांवरील आहे. हे किया इव्ही ६ जीटी व्हेरीयंट असल्याचे समजते.
या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ही कार बाजारात येण्याची शक्यात असून तिची स्पर्धा टाटा नेक्सोन, एमजी झेडएस बरोबर असेल. कियाच्या इलेक्ट्रिक कार्स युरोप बाजारात आहेत. इव्ही ६ जीटी व्हेरीयंट मध्ये ड्युअल इलेक्ट्रिक ऑल व्हील ड्राईव्ह सिस्टीम असून ७७.४ केडब्ल्यूएच ची पॉवरफुल बॅटरी आहे. ग्लोबल सर्टिफिकेट नुसार किया इव्ही ६ सिंगल चार्ज मध्ये ४२५ किमी अंतर कापते. अल्ट्रा फास्ट चार्जिंग सिस्टीम दिली गेली असून त्यामुळे १८ मिनिटात बॅटरी १० ते ८० टक्के चार्ज होते.
जागतिक पातळीवर किया इव्ही ३ व्हेरीयंट मध्ये आहे. इव्ही ६, इव्ही ६ जीटी लाईन आणि इव्ही ६ जीटी. युरोपीय देशात या कारची किंमत ४५ हजार युरो आहे. भारतात ही कार सीबीव्ही रूटच्या माध्यमातून आली तर तिची किंमत अंदाजे ६० लाख रुपये असेल असे सांगितले जात आहे.