रोनाल्डो मैत्रिणीला देतो दरमहा ८२ लाख पगार

प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो जसा त्याचा खेळामुळे प्रसिद्ध आहे तसाच तो त्याची गर्लफ्रेंड जोर्जिनामुळेही नेहमी चर्चेत असतो. रोनाल्डो जगातील श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याची राहणी अतिशय अलिशान आहे. एका रिपोर्ट नुसार रोनाल्डोच्या लग्झरी जीवनमानाचा अंदाज तो त्याची गर्लफ्रेंड जोर्जीनाला देत असलेल्या दर महिना खर्चाच्या रकमेवरून करता येतो. ही रक्कम फिक्स असल्याने ब्रिटीश मिडिया तिला सॅलरी म्हणतात. रोनाल्डो जोर्जिनाला दरमहा ८३ हजार पौंड म्हणजे ८२ लाख रुपयापेक्षा अधिक रक्कम खर्चासाठी देतो. यातून जोर्जिना मुलांची देखभाल आणि अन्य खर्च करते. या दोघांना चार मुले आहेत.

जोर्जिना पूर्वी एका दुकानात सेल्समन म्हणून काम करत होती. तेव्हा तिचा पगार काही शेकड्यात होता. पण २०१६ मध्ये रोनाल्डो बरोबर तिची ओळख झाली आणि तिचें आयुष्य बदलले. आज जोर्जिना मॉडेल म्हणून काम करते. अनेक बड्या ब्रांडच्या जाहिराती ती करते आणि इन्स्टाग्रामवर तिचे ३६.६ दशलक्ष फॉलोअर आहेत. ‘आय अॅम जोर्जिना’ या नावाची तिची एक डॉक्युमेंटरी नुकतीच रिलीज झाली आहे. त्यात तिच्या आयुष्यातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला गेला आहे.

२०१६ पासून रोनाल्डो आणि जोर्जिना एकत्र राहतात. द मिरर च्या रिपोर्टप्रमाणे जोर्जिना ४८ कोटींच्या अलिशान घरात राहते, ५५ कोटींचे याट, बुगाटी, फेरारी, रोल्स रॉइस अश्या गाड्यातून प्रवास करते. आणि गल्फस्ट्रीम जी २० या विमानातून रोनाल्डो सोबत प्रवासाचा आनंद लुटते.