रणबीर –आलीया ‘वास्तू’ मध्येच घेणार सात फेरे

बॉलीवूडची लोकप्रिय जोडी रणबीर कपूर आणि आलीया भट्ट यांच्या विवाहासंबंधी नवीन अपडेट आले असून हे दोघे आर के स्टुडीओ ऐवजी यांच्या पाली हिल येथील पॉश ‘वास्तू’ या बिल्डींग मधील घरातच सात फेरे घेणार आहेत आणि तेही १६ एप्रिल रोजी. या मागे ८ या लकी नंबरचे विशेष महत्व आहे असेही सांगितले जात आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार रणबीर कपूर याने वास्तू मधील एक बँक्वेट आठ दिवस बुक केला आहे. याच बिल्डींग मध्ये रणबीर याचा सातव्या मजल्यावर तर आलीया हिचा पाचव्या मजल्यावर प्रशस्त फ्लॅट आहेत आणि ते दोघे याच इमारतीत राहतात. विवाहाचे बहुतेक सर्व विधी याच घरात करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी इमारत आणि रस्त्यावर सजावट केली जात आहे. इमारतीतील रहिवाशांनी परवानगी दिली तर बँडबाजा वाजेल असेही सांगितले जात आहे. ही इमारत कपूर परिवाराच्या कृष्णा राज बंगल्याच्या अगदी जवळ आहे.

नवीन वेळापत्रकानुसार १३ एप्रिल रोजी मेहेंदी, १४ रोजी हळद होणार असून १५ एप्रिल रोजी पंजाबी पद्धतीने लग्नविधी सुरु होणार आहेत. त्यात रात्री २ ते ४ या वेळात म्हणजे १६ एप्रिलला पहाटे सात फेरे घेतले जाणार आहेत. या कार्यक्रमाचे फोटो मिडियाबरोबर शेअर केले जाणार आहेत. १६ तारीख ठरविण्यामागे ८ या लकी नंबरचा हात आहे. रणबीरचे आईवडील म्हणजे नीतू, ऋषी साठी ८ नंबर लकी होता. १६ /४/२०२२ याची बेरीज २०४२ म्हणजे ८ येते आणि हा ‘दुल्हेराजा रणबीर’ चाही लकी नंबर आहे.