नवी दिल्ली – बुधवारी राज्यसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काश्मिरच्या खोऱ्यात मागील पाच वर्षांमध्ये अल्पसंख्यांक समाजातील ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी माहिती दिली. जम्मू-काश्मिरमध्ये ५ ऑगस्ट २०१९ पासून या वर्षाच्या मार्च दहशतवाद्यांकडून चार काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली आहे. तसेच वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अन्य १० हिंदू मारले गेले आहेत. सध्या काश्मिरच्या खोऱ्यात पुन्हा एकदा दुसऱ्या राज्यांमधून आलेले मजूर आणि अल्पसंख्यांकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे. सोमवारी दहशतवाद्यांनी बाल कृष्ण नावाच्या एका काश्मिरी पंडितावर हल्ला केला. तर या घटनेनंतर पुढील २४ तासांमध्ये पंजाब आणि बिहारमधून आलेल्या चार मजुरांना गोळीबार करुन दहशतवाद्यांनी जखमी केले.
गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली कलम ३७० हटवल्यानंतर झाली एवढ्या काश्मिरी पंडितांची हत्या झाल्याची माहिती
एका लेखी स्वरुपात गृह राज्यमंत्री नित्यानंतर राय यांनी दिलेल्या उत्तरामध्ये सरकारने काश्मिरच्या खोऱ्यात अल्पसंख्यांक समुदायाची सुरक्षा निश्चित करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याचे सांगितले. यामध्ये सशक्त सुरक्षा, स्टॅटिस्टीक गार्ड्सच्या स्वरुपामध्ये सामूहिक सुरक्षा, या क्षेत्रामध्य् दिवसरात्र डोमिनेशन, तपास नाक्यांच्या माध्यमातून २४ तास येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी, अल्पसंख्यांक राहत असणाऱ्या वस्त्यांमध्ये सुरक्षा दलांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्याचे सांगितले.
गृह राज्यमंत्र्यांनी अन्य एका उत्तरामध्ये काश्मिरमध्ये सीमेपलीकडून होणारी घुसखोरी २०१८ पासून कमी झाल्याचे म्हटले आहे. २०१७ मध्ये १३६ वेळा घुसखोरी झाली. २०८ मध्ये १४३ वेळा, २०१९ मध्ये १३८ वेळा, २०२० मध्ये ५१ वेळा तर २०२१ मध्ये हा आकडा ३४ एवढा होता. घुसखोरी रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा व्यवस्था, गुप्त आणि माहिती देवाण-घेवाणीमध्ये सुधारणा, सुरक्षा दलांना आधुनिक हत्यारं पुरवणे यासारख्या गोष्टींचा यामध्ये समावेश असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
सरकारने दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स भूमिका स्वीकारल्यामुळे जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादाच्या घटना कमी झाल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणाले. सन २०१८ मध्ये ४१७ दहशतवादी घटना झाल्या होत्या. यात २०१९ मध्ये घट होऊन आकडा २५५ वर पोहोचला. २०२० मध्ये २४४ तर २०२१ मध्ये २२९ वर हा आकडा होता.