एलियन्स करताहेत पृथ्वीवरील महिलांना प्रेग्नंट?
अमेरिकेच्या द डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्ट मुळे चांगलीच खळबळ माजली असून या रिपोर्ट मध्ये एलियन्स पृथ्वीवरील महिलांना प्रेग्नंट करत असल्याचा दावा केला गेला आहे. वास्तविक परग्रहवासी प्रत्यक्षात आहेत का याचेच स्पष्ट पुरावे अजून मिळालेले नाहीत. मात्र तरीही अनेक लोक परग्रहवासी, त्याच्या उडत्या तबकड्या पाहिल्याचे दावे करत आले आहेत.
गेला काही काळ अमेरिकेतील वरिष्ठ अधिकारी एलियन्स बाबतची गुपिते जगासमोर आणत आहेत. पेंटागॉनने छापलेल्या एका अहवालात एलियन्सना प्रत्यक्ष पहिल्याच्या वृताला दुजोरा दिला गेला आहे. पृथ्वीवरील महिलांना एलियन्स प्रेग्नंट करत असून त्यांना स्वतःच्या ग्रहावर फिरवून आणत असल्याच्या घटना घडल्याचे उल्लेख त्यात आले आहेत. ही फाईल डिफेन्स इंटेलीजन्स एजन्सीने ‘फ्रीडम ऑफ इन्फोर्मेशन रिक्वेस्ट’ म्हणजे माहिती अधिकार खाली रिलीज केल्याचे सांगितले जात आहे.
द सनच्या बातमीनुसार असे किमान पाच मामले समोर आले असून एलियन्स पासून प्रेग्नंट झालेल्या महिलांची ओळख गुप्त ठेवली गेली आहे. युएफओच्या संपर्कात आल्याने संबंधित व्यक्तींचे नुकसान झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. युएफओ मधून येणाऱ्या रेडीएशन मुळे ब्रेन डॅमेज, त्वचा जळणे, मज्जासंस्थेवर परिणाम झाल्याच्या ४२ केसेस समोर आल्या असल्याचा आणि समोर न आलेल्या आणखी ३०० केसेस असल्याचा दावा केला जात आहे.