एप्रिल मध्येच भारतात येतोय टेक्नो फँटम एक्स स्मार्टफोन

टेक्नो त्यांचा नवा स्मार्टफोन फँटम एक्स भारतात एप्रिल २०२२ मध्येच सादर करण्याचा तयारीत आहे असे समजते. कंपनीचा हा पहिला प्रीमियम फोन आहे. समर सनसेट आणि स्टारी नाईट ब्ल्यू अशा दोन कलर ऑप्शन मध्ये हा फोन मिळणार आहे. जागतिक बाजारात गेल्या जून मध्येच हा फोन सादर झाला असून भारतात याच व्हेरीयंट मध्ये तो सादर केला जात आहे.

या फोनच्या ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज व्हेरीयंटची किंमत २५ हजार रुपये असेल असे म्हटले जात आहे. ग्लोबल व्हेरीयंट ८ जीबी एलपीपीडीडीआर ४ एक्स रॅम, व २५६ जीबी स्टोरेजचे आहे. या फोनला ६.७ इंची अमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे. कर्व्ड एज डिझाईन, गोरील्ला ग्लास ५ प्रोटेक्शन, अँड्राईड ११ ओएस आहे. रीअरला लेजर ऑटोफोकस सपोर्टचा ५० एमपीचा प्रायमरी कॅमेरा, १३ एमपीचे टेलीफोटो लेन्स २ एक्स झूम व ८ एमपीचा अल्ट्रावाईड सेन्सर तसेच क्वाड एलईडी फलॅश दिला गेला आहे.

फ्रंटला सेल्फीसाठी ड्युअल कॅमेरा सेट असून त्यातील एक ४८ एमपीचा तर दुसरा ८ एमपीचे अल्ट्रावाईड लेन्स आहे. फोन साठी ४७०० एएमएचची बॅटरी, ३३ डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे. सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आहे.