मुंबईतील मद्यविक्रीच्या दुकानांना महापुरुष आणि गड-किल्ल्यांची नावे नको


मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील विद्यापीठ, शाळा, दुकाने यांचे नामफलक नामफलक मराठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर ज्या दुकानांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विक्री केली जाते, अशा दुकानांवर नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहू नयेत, असे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहे. हा निर्णय मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा त्या दृष्टिकोनातून घेण्यात आला आहे.

मुंबईतील दुकानांच्या नामफलकावर प्रथमदर्शनी अर्थात सुरुवातीला मराठी भाषेत देवनागरी लिपीत नाव लिहिणे आवश्यक आहे. तसेच इतर कोणत्या भाषेत देखील नाव लिहिले जाणार असेल, तर त्या भाषेच्या तुलनेत मराठीतील नाव हे मोठ्या अक्षरातच असले पाहिजे. तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा दुकानांवर नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहू नयेत. या नियमांचे उल्‍लंघन केल्यास संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेने आदेश दिले आहे.

देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये मुंबईतील प्रत्येक दुकाने नामफलक असला पाहिजे. परंतु, अशा दुकानांचे नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. पण, मराठी भाषेतील अक्षर हे नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा फॉन्ट साईज इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असता कामा नये, म्हणजेच मराठी फॉन्टचा आकार हा इतर कोणत्याही भाषेपेक्षा मोठ्या आकारात असणे आवश्यक आहे.