वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी पकडले


काही महिन्यापूर्वीच प्रदर्शित झालेला दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा : द राइज’ बराच गाजला. अल्लू अर्जुनला या चित्रपटाने बरीच लोकप्रियता मिळवून दिली. सोशल मीडियावर या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. अल्लू अर्जुनची ‘पुष्पा’ ही भूमिका प्रचंड गाजली होती. पण आता पुष्पाने खऱ्या आयुष्यातही काही निमय मोडले आहेत. काही रिपोर्ट्सच्या माहितीप्रमाणे नुकतेच वाहतुकीचे नियम अल्लू अर्जुनने मोडले आहेत. त्यानंतर त्याला हैदराबाद पोलिसांनी त्याला पकडले.

यासंदर्भात ‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या एका वृत्तानुसार वाहतुकीचे नियम अल्लू अर्जुनने मोडल्यामुळे त्याला दंडही भरावा लागला आहे. अल्लू अर्जुनच्या लग्झरी कार लँड रेंज रोवरचे हैदराबाद पोलिसांनी चालान कापून त्याच्याकडून ७०० रुपयांचा दंड देखील वसूल केला. मिळालेल्या माहितीनुसार काळ्या रंगाच्या काचा असलेल्या कारमधील अल्लू अर्जुनला पोलीसांनी हैदराबादच्या बीजी सेंटरजवळ थांबवले. कारण भारतात अशा प्रकारच्या काचा वापरण्यावर बंदी आहे. पण असे असतानाही भारतात अनेक सेलिब्रेटी अशाप्रकारच्या कारचा वापर करतात. पण पोलीस देखील त्यांचे काम चोख पार पाडताना दिसत आहेत.

दरम्यान याआधी हैदराबाद ट्राफिक पोलीसांनी तेलुगू दिग्दर्शक Trivikram Srinivas, कल्याण राम, जूनियर एनटीआर आणि Manchu Mano यांनाही अशाप्रकारे कारला काळ्या रंगाच्या काचा वापरल्यामुळे रस्त्यात थांबवून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे.