फूड डिलिव्हरी झोमॅटो आणि स्विगीची अॅप सेवा कोलमडली


मुंबई : आज अनेकांना झोमॅटो आणि स्विगी या फूड डिलिव्हरी अॅपवरुन खाद्यपदार्थांची ऑर्डर देताना अडचणी आल्या. काही तांत्रिक अडचणी या दोन्ही अॅपमध्ये आल्यामुळे ही सर्व्हिस कोलंडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांकडे तक्रारीचा पाऊस पडल्याचे दिसून येत आहे.

या दोन्ही अॅपमध्ये ही अडचण आज दुपारच्या दरम्यान आल्याचे अनेक यूजर्सनी सांगितले आहे. यामध्ये यूजर्सचे पैसे कट होत आहेत, पण ऑर्डर प्लेस होत नसल्याचे समोर आले. त्यामुळे अनेक यूजर्स हैराण झाले आहेत. त्यांनी आपल्या तक्रारी या दोन्ही कंपन्यांच्या वेब साईटवर आणि सोशल मीडियावर मांडल्या आहेत.

काही तांत्रिक कारणांमुळे आमच्याकडे फूड ऑर्डर प्लेस करण्यामध्ये काही अडचणी येत आहेत, पण ही सेवा लवकरात लवकर सुरळीत केली जाईल, असे झोमॅटोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यूजर्सनी आपल्याकडून पैसे कट होत आहेत, पण त्याची ऑर्डर प्लेस होत नसल्याच्या तक्रारी करत स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत.