गुगल मॅपवर या जागांचा मिळणार नाही पत्ता

नवे शहर, नवीन जागा शोधायच्या असतील तर आजकाल बहुतेक सर्व गुगलचे सहाय्य घेतात. यामुळे कोणतीही जागा सहज, कुणालाही पत्ता न विचारता सापडते असा अनेकांचा अनुभव आहे. पण जगात अश्याही अनेक जागा आहेत ज्याचा पत्ता गुगल मॅप वर सापडत नाही किंवा गुगल अर्थवर सुद्धा या जागा ब्लर्ट केल्या गेल्या आहेत. कोणत्या आहेत अशा जागा याची खास माहिती आमच्या खास वाचकांसाठी

मिडिया रिपोर्ट नुसार अश्या किमान १२ जागा आहेत ज्यावर गुगलने बंदी घातली आहे. २२०७, सेमोर अव्हेन्यू ओहिओ मधील हे घर त्यात समाविष्ट आहे. असे सांगतात कि या घरात एका व्यक्तीने २००२ ते २००४ या काळात काही मुलींचे अपहरण करून त्यांना २०१३ पर्यंत येथे डांबून ठेवले होते. दुसरी जागा आहे फ्रांस मधील प्रिझन डी मॉटलुकॉन. मध्य फ्रांस मधील या जेल संदर्भात फ्रांस सरकारने २०१८ मध्ये सुरक्षा कारणास्तव या जेलची माहिती दिली जाऊ नये अशी विनंती गुगल कडे केली आहे.

फ्रांसमधील मोरूरॉआ प्रवाळद्वीप असेच सेन्सोर केले गेले आहे. या द्विपाचा इतिहास आण्विक बाबींशी जोडला गेला आहे. फ्रांसच्याच न्युक्लिअर फ्युल रिप्रोसेसिंग फॅसीलीटीची माहिती सुद्धा गुगल मॅप वर मिळत नाही. येथूनच जगातील अनेक देशांना अणुइंधन पुरवठा केला जातो. ब्रिटन मधील प्रिन्सपोर्ट रोडवर स्टॉकटन ओन टीझ या घराचा पत्ता गुगल मॅपवर नाही. रशियाच्या सुमारे १.२ मैल आकाराच्या जेनेट आयलंडलाही गुगल अर्थवर ब्लर्ट केले गेले आहे. रशिया आणि अमेरिकेतील तणाव त्यासाठी कारणीभूत आहे असे सांगतात.

उत्तर कोरियातील अनेक जागा गुगल मॅप वर शोधता येत नाहीत. अलास्का मधील अॅनायीटका बेट असेच गायब आहे. या बेटावर अमेरिका अण्वस्त्र चाचण्या करत असे. त्यामुळे या बेटाचे अनेक भाग ब्लर्ट केले गेले आहेत. ग्रीसची राजधानी अथेन्स येथील मिलिटरी बेस सुरक्षा कारणास्तव गुगल मॅपवर नाही.

सर्वात महत्वाचे आणि नवलाचे म्हणजे अॅपल इंकचे सीईओ टीम कुक यांच्या घराचा सर्व भाग सुद्धा गुगल वर दिसत नाही. २५ कोटींपेक्षा अधिक किमतीच्या या घराचा काहीच भाग गुगल अर्थवर दिसतो. पोलंडचे स्पेशल फोर्स कमांड ट्रेनिंग असेच गुगल अर्थ वर ब्लर्ट केल्याचे दिसते.