रणबीर- आलीया स्वित्झर्लंडमध्ये साजरा करणार हनिमून

बॉलीवूड मधील लोकप्रिय जोडी रणबीर कपूर आणि आलीया भट यांच्या विवाहाच्या चर्चा पुन्हा वेगाने सुरु झाल्या असून ही जोडी १७ एप्रिल रोजीच विवाहबद्ध होत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्या संदर्भात रोज काहीतरी नवीन सांगितले जात असताना विवाह निमंत्रित पाहुण्याची यादी लिक झाली आहे. कपूर परिवाराकडून अजून विवाहाची तयारी नाही असे सांगितले जात आहे. मात्र तोपर्यंत आलीया रणबीर स्वित्झर्लंड मध्ये हनिमून साजरा करणार असल्याची वार्ता येऊन थडकली आहे.

यापूर्वी आलीया आणि रणबीर विवाह होताच त्वरीत पुन्हा काम सुरु करणार असल्याची चर्चा होती आणि त्यामुळे ते हनिमून साजरा करणार नाहीत असे सांगितले जात होते. पण आता आलीया तिच्या आगामी रॉकी और राणी की प्रेमकहानी या चित्रपटाच्या शुटींग साठी स्वित्झर्लंडला जाणार असल्याने रणबीर तिला तेथेच जॉईन होणार असल्याचे ऐकु येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १७ एप्रिल रोजी आलीया आणि रणबीर आर.के. हाउस मध्ये विवाहबद्ध होत असून १३ एप्रिल पासून विवाह कार्यक्रम सुरु होत आहेत. इंडिया टुडे च्या ताज्या बातमीनुसार विवाहासाठी बोलावल्या गेलेल्या पाहुण्यांमध्ये शाहरुख खान, वरुण धवन, करन जोहर, संजय लीला भन्साळी, झोया अख्तर, मनीष मल्होत्रा, अर्जुन कपूर यांच्या सह अनेक बॉलीवूड कलाकार आहेत. करिश्मा, करीना घरच्याच करवल्या म्हणून परिवारासह उपस्थित राहणार आहेत.