ब्राझिलियन मॉडेलच्या नऊ बायकांपैकी एकीने घेतला घटस्फोट
ब्राझिलियन मॉडेल आर्थर त्यांच्या नऊ बायकांसह एकाच घरात राहू लागला आणि तो प्रसिद्धीच्या झोतात आला. आता मात्र आर्थर वेगळ्याच अडचणीत आला आहे. नऊ पैकी त्यांच्या एक बायकोने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याने आर्थर फार दुःखी झाला आहे. आर्थरने या बाबत पत्रकारांशी बोलताना आपले मत मांडले आहे.
आर्थर म्हणतो गेल्या वर्षी मी नऊ बायकांबरोबर एकाच वेळी विवाह केला. वास्तविक ब्राझील मध्ये बहुपत्नीत्व मान्य नाही. त्यामुळे हा विवाह बेकायदा आहे असे म्हटले जाते. आर्थर सांगतो माझे सर्व नऊ बायकांवर समान प्रेम आहे. पण आता त्यापैकी एकीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याने मी निराश झालो आहे. तिने घटस्फोट घेण्यासाठी जे कारण दिली आहे त्याचा मला अधिक त्रास होत आहे.
न्यूयॉर्क पोस्ट नुसार आर्थरने लुआना काज्की बरोबर प्रथम लग्न केले पण त्यानंतर ‘ फ्री लव’ चा पुरस्कार करून आणखी आठ लग्ने केली आणि तो चर्चेत आला. आता लुआनाला पतीवर एकाच बायकोचा अधिकार असावा हे पटले आहे. त्यामुळे आर्थरने फक्त तिच्यासोबत राहावे अशी तिची इच्छा आहे. पण आर्थरला मात्र सर्व परिवार एकत्र हवा आहे. लुआनाचे म्हणणे साफ चुकीचे आहे असे त्याला वाटते. अर्थात लुआना वेगळी झाली तरी तिची जागा तो सध्या तरी कुणालाच देणार नाही. पण पूर्वी आर्थरने १० लग्ने एकाचवेळी करण्याचे स्वप्न पाहिले होते आणि ते तो लवकरच पूर्ण करेल असे म्हटले जात आहे.