ह्युंदाई लवकरच लाँच करणार Creta Knight Edition


लोकप्रिय एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाचे यश पाहिल्यानंतर कंपनी एक नवीन आवृत्ती लाँच करणार आहे. क्रेटा नाईट एडिशन असे या गाडीचे नाव आहे. या एसयूव्हीमध्ये कंपनी सध्याच्या क्रेटापासून एक्सटीरियर, इंटीरियर तसेच इंजिनमध्ये अपडेट करणार आहे. तुम्ही देखील जर ह्युंदाई क्रेटाच्या नवीन आवृत्तीच्या लाँचची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनी कोणत्या नवीन अपडेट्ससह बाजारात गाडी लाँच करणार आहे, याबाबत माहिती जाणून घेऊ शकता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्वात मोठे अपडेट या एसयूव्हीच्या इंजिनमध्ये केले जाऊ शकते. या एसयूव्हीमध्ये कंपनी दोन इंजिनांचा पर्याय देणार आहे, ज्यामध्ये पहिले इंजिन १.५ लीटर पेट्रोल इंजिन असेल. हे इंजिन ११५ पीएस पॉवर आणि १४४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यातील दुसरे इंजिन १.५ लिटर टर्बो डिझेल इंजिन असेल जे ११५ पीएस पॉवर आणि २५० एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

या दोन्ही इंजिनसह ५-स्पीड एएमटी आणि सीव्हीटी ट्रान्समिशनचा पर्याय दिला जाऊ शकतो. याशिवाय, ह्युंदाई क्रेटा नाईट एडिशनमध्ये पहिला प्रकार S+ आणि दुसरा SXO असणार आहे. यामध्ये नवीन ट्राय बीम एलईडी हेडलॅम्प, अलॉय व्हील, पॅनोरामिक सनरूफ यांसारखे फीचर्स अपडेट करण्यात आले आहेत.

कंपनीने ह्युंदाई क्रेटा नाईट एडिशनच्या केबिनमध्ये मोठा बदल केला आहे. यात सर्व ब्लॅक इंटीरियर कलर थीम वापरण्यात आली आहे. या नाईट एडिशनमध्ये अद्ययावत एसी व्हेंट्स हायलाइट करण्यात आले आहेत. तसेच दिलेल्या आसनांवर वेगवेगळ्या रंगांची स्टिचिंग केली आहे.

ह्युंदाई क्रेटा नाईट एडिशनमध्ये अपडेट करताना, मागील आणि समोरच्या स्किड प्लेट्सना ग्लॉस फिनिश देण्यात आला आहे. तसेच, सी पिलरवर लाइटिंग आणि फ्रंट ग्रिलवर पेंडंट ग्लॉस ब्लॅक कलरसह अपडेट केले गेले आहेत. कंपनीने या कारच्या किंमतीबाबत कोणतीही घोषणा केली नसली तरी तज्ज्ञांच्या मते, कंपनी या ह्युंदाई क्रेटा नाईट एडिशनची सुरुवातीची किंमत १३.५० लाख रुपये (एक्स-शोरूम) सह लॉन्च करेल.