येतेय सोलर पॉवर एसयूव्ही, सिंगल चार्ज मध्ये ८०५ किमी धावणार

सध्या इंधन टंचाई, वाढत्या इंधन किमती आणि प्रदूषण यामुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कार्स बाजारात सादर केल्या आहेत त्यात आता एक धमाकेदार नवी एन्ट्री होत आहे. कॅलिफोर्नियामधील स्टार्टअप हंबल मोटर्सने सोलर पॉवरवर धावणारी इलेक्ट्रिक कार तयार केली असून या प्रकारची ही जगातील पहिली कार असल्याचा दावा केला आहे. गेली दोन वर्षे कंपनी या कारवर काम करत होती. आता २०२४ मध्ये या कारचे उत्पादन सुरु होत आहे आणि २०२५ पासून तिची डिलिव्हरी दिली जाणार असल्याचे जाहीर केले गेले आहे.

सोलर पॅनल इलेक्ट्रिक कार हा जगातील मोठा शोध मानला जात आहे. ही कार सिंगल चार्ज मध्ये ८०५ किमी अंतर कापते आणि फक्त सोलर मोड मध्ये ९६ किमी अंतर पार करेल. या कारची बॅटरी सूर्यप्रकाश आणि वीज अशी दोन्हीवर चार्ज होणार आहे. याला पॉवर सॉकेट, स्टँडर्ड इव्ही चार्जिंग पॉइंट व इव्ही फास्ट चार्जिंग करता येणार आहे.

या पाच सीटर एसयुव्हीच्या छतावर फोटोवोल्टेइक सेलने बनलेले ८२.३५ चौ.फुट सोलर पॅनल बसविले गेले आहे. या कारची किंमत १,०९,००० डॉलर्स म्हणजे साधारण ८० लाख रूपये आहे. ३०० डॉलर्स भरून ही कर बुक करता येणार आहे.